पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक

By Admin | Updated: November 3, 2016 05:35 IST2016-11-03T05:35:46+5:302016-11-03T05:35:46+5:30

घोळकर यांच्यासह तिघा पोलिसांना मारहाण करणाऱ्या संतोष (३८), दिनेश (४०) आणि सुनिल कदम (३४) या तिघा भावांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली.

Police arrested the assailants | पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक


ठाणे : दोन कुटूंबातील वाद पोलीस चौकीपर्यंत आल्यानंतर तिथे भांडण सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक नितीन घोळकर यांच्यासह तिघा पोलिसांना मारहाण करणाऱ्या संतोष (३८), दिनेश (४०) आणि सुनिल कदम (३४) या तिघा भावांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे तिघेही वागळे इस्टेट, हाजुरी गावातील शिवसेना शाखेच्या पाठीमागील साईनाथ सोसायटीमध्ये राहतात. १ नोव्हेंबर रोजी त्यांच्याच सोसायटीतील मोरे कुटूंबियांशी त्यांचा वाद झाला. स्थानिक रहिवाशांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर घोळकर यांनी त्यांना पोलीस चौकीत आणले. तिथे या तिघांनी शिवीगाळ करून घोळकर यांच्या कॉलर फाडून धक्काबुक्की केली. याप्रकरणी घोळकर यांनी वागळे इस्टेट पोलिसांत तक्रार दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Police arrested the assailants