बलात्कार प्रकरणातील पोलीस पिता-पुत्र पोलिसांसमोर हजर
By Admin | Updated: June 26, 2017 01:49 IST2017-06-26T01:49:15+5:302017-06-26T01:49:15+5:30
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी परवेज शेख व त्याचा फौजदार पिता रईस

बलात्कार प्रकरणातील पोलीस पिता-पुत्र पोलिसांसमोर हजर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी परवेज शेख व त्याचा फौजदार पिता रईस शेख रविवारी सकाळी येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी त्यांची चौकशी करत जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर परवेजची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
वाढदिवसानिमित्त नशेचे पान खायला देत परवेज शेख रईस शेख याने २४ वर्षीय पीडित तरुणीवर २०१२ साली बलात्कार केला. त्यानंतर मे २०१७ पर्यंत विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. यात त्याला फौजदार पिता रईस याने मदत करून तरुणीशी अश्लील कृत्य केल्याचेही तिने म्हटले आहे.