कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यावर

By Admin | Updated: October 31, 2015 01:46 IST2015-10-31T01:46:02+5:302015-10-31T01:46:02+5:30

छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होत आल्याने येत्या काही दिवसांत त्याला भारतात आणण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलिसांतील सूत्रांकडून देण्यात आली.

At the point of completion of the documentation process | कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यावर

कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यावर

मनीषा म्हात्रे, मुंबई
छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होत आल्याने येत्या काही दिवसांत त्याला भारतात आणण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलिसांतील सूत्रांकडून देण्यात आली. राजनच्या रेडकॉर्नर नोटिसी अंतर्गत असलेल्या प्रमुख १४ गुन्ह्यांचा तपशील इंडोनेशियाला पाठवण्यात आला आहे. उर्वरित गुन्ह्यांचे भाषांतरही अंतिम टप्प्यात आहे. मुंबई पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत.
राजनवरील गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जवळपास ७६ गुन्ह्यांची आकडेवारी एकत्रित करण्यात आली आहे. त्यापैकी रेडकॉर्नर नोटीस अंतर्गत राजनवर १४ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जे. डे खून खटला
अग्रस्थानी आहे. या १४ गुन्ह्यांचे इंग्रजीत भाषांतर केलेली कागदपत्रे घेऊन मुंबई पोलिसांचा एक अधिकारी सध्या दिल्लीत तळ ठोकून आहे. त्यांनी ही कागदपत्रे सीबीआयकडे सुपुर्द केली. सीबीआयमार्फत ही कागदपत्रे इंडोनेशिया प्रशासनापर्यंत पोहोचली आहेत. उर्वरित गुन्ह्यांतील तपशिलाच्या भाषांतराचे कामही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. तपासादरम्यान मदत म्हणून पूर्वीच्या गुन्ह्यांतील तपास अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात
येणार आहे.
तसेच राजन भारतात आल्यानंतर मुंबई पोलिसांकडे सुरक्षित राहणार असल्याची खात्रीही गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात आली. त्यानुसार गुप्तचर यंत्रणांनी आखणीही केली असून, मुंबईतील गँगस्टरच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे.
संतोष शेट्टी दाऊदशी कनेक्ट...
एकेकाळी राजनचा खास असलेला गँगस्टर संतोष शेट्टी दाऊदशी जवळीक साधून असल्याची धक्कादायक माहिती उघड होत आहे. राजनच्या जिवाला धोका असताना वेळोवेळी शेट्टीने राजनला मदत केली होती. मात्र शेट्टी दाऊद गँगशी संपर्कात असल्याने दाऊद शेट्टी नेटवर्कचा वापर करून राजनचा गेम करू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजन घाबरला असून, त्याने सुरक्षेची मागणी केली आहे. राजनच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असे शासनाकडून पोलीस यंत्रणेला कळविण्यात आले आहे.

Web Title: At the point of completion of the documentation process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.