पोदार स्कूलने केले तिसरी, चौथीतील विद्यार्थ्यांना नापास

By Admin | Updated: April 7, 2015 04:37 IST2015-04-07T04:37:26+5:302015-04-07T04:37:26+5:30

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात (आरटीई) पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करु नये अशी तरतूद आहे.

Podar school did not disappoint third, fourth students | पोदार स्कूलने केले तिसरी, चौथीतील विद्यार्थ्यांना नापास

पोदार स्कूलने केले तिसरी, चौथीतील विद्यार्थ्यांना नापास

मुंबई : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात (आरटीई) पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करु नये अशी तरतूद आहे. परंतू आरटीई कायद्याचे उल्लंघन करत सांताक्रुझ येथील पोदार स्कूलने विद्यार्थ्यांना तिसरी आणि चौथीच्या वर्गात नापास केले आहे. तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच परीक्षा पार पडली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करुन त्याच वर्गात बसविण्यात आले. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने पालकांनी न्यायासाठी पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. शाळेने आरटीई कायद्याचे उल्लंघन केल्याने शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Podar school did not disappoint third, fourth students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.