शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळा : केवळ ठेविदार बदलले, परिस्थिती नाही, राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी, जेटलींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 22:27 IST

हिरे व्यावसायिक निरज मोदी  पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे.

मुंबई -  हिरे व्यावसायिक निरज मोदी  पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. रविवारी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात  राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी आपण देशाचे चौकीदार असल्याचा भाषणांमधून केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून मोदींवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रामध्ये विजय माल्ल्या, निरज मोदी यांच्यासारखे घोटाळेबाज बँका लुटून पळताना दिसत आहेत, तर स्वत:ला चौकीदार समजणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अरुण जेटली  गाढ झोपलेले दिसत आहे. तर सर्वसामान्य ठेविदार चिंतेत आहेत. याआधी जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी जिथे लष्कराला सहा ते सात महिने लागतील, तिथे तेच काम संघाकडून तीन दिवसांत करता येईल, असा दावा करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रामधून निशाणा साधला आहे. संघाची लष्कराशी तुलना म्हणजे भागवत यांनी थंडीच्या दिवसांमध्ये पाहिलेले उबदार स्वप्न असून,  भागवत आणि संघ स्वयंसेवकांना नियंत्रण रेषेवर पाठवले तर त्यांच्याकडील दंडुका आणि बौद्धिक घेणारी पुस्तके पाहून पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी पसार होतील, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला आहे. त्याआधीच्या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचा समाचार घेतला होता. या व्यंगचित्रात अहो, कधी तरी आमच्याही छकुल्याचं कौतुक करा ना, असा मोदी मनमोहन सिंगांना सांगताना दाखवण्यात आले होते. त्यावर मनमोहन सिंगांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी, नक्की केले असते पण त्यात नुसताच पेंढा भरलाय, असं उत्तर मनमोहन सिंग यांनी दिलं आहे. व्यंगचित्रातून मोदी हातातून बाबागाडी घेऊन जात असताना पेंढ्याच्या स्वरूपात एक प्रतीकात्मक बाहुलं दाखवण्यात आलं आहे. त्या पेंढ्यानं भरलेल्या योजनारूपी बाहुल्याला जाहिरातबाजीचं विशेषण लावण्यात आलं आहे. तर मोदींच्या मागे अमित शाह खेळणी घेऊन चालताना दाखवण्यात आले आहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटली