शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
4
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
5
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
6
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
7
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
8
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
9
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
10
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
11
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
12
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
13
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
14
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
15
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
16
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
17
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
18
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
19
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
20
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

पीएमसी बँक घोटाळाप्रकर : हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचे छापे; वसई, मीरा-भाईंदर येथे ६ ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:46 IST

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. यात काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल विवा ग्रुपमध्ये करण्यात आल्याच्या संशयातून ईडीने त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचे समजते.

मुंबई/नालासोपारा : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपची शुक्रवारी सकाळपासून झाडाझडती सुरू केली. यात वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. यात काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल विवा ग्रुपमध्ये करण्यात आल्याच्या संशयातून ईडीने त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचे समजते. दरम्यान, काही महत्त्वाची कादगत्रे ईडीच्या हाती लागल्याची सुत्रांची माहिती आहे.दरम्यान, प्रवीण राऊत हा एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. राऊतने ९५ कोटींपैकी १ कोटी ६० लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. त्यातील ५५ लाख पुढे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिले होते. त्यानुसार वर्षा यांच्याकडेही ईडीने चौकशी केली. त्यानंतर त्यांनी ते पैसे परत केले.जे काही व्यवहार असतील त्याचे स्पष्टीकरण देऊ - ठाकूरईडीचे अधिकारी आले असून ते चौकशी करतील. अद्याप माझ्यापर्यंत काेणीही आलेले नाही. ते त्यांचे काम करत आहेत. सध्या तरी आमच्या स्टेशनलगत असलेल्या घरी व कार्यालयात चौकशी सुरू आहे. नाव कशातही येऊ द्या. जे काही व्यवहार आहेत त्याचे स्पष्टीकरण आम्ही देऊ. ते माझ्याकडे आलेले नसून आमच्या परिवाराच्या नावावर असलेल्या विवामध्ये आले आहेत. ईडी माझ्यामागे लागण्याइतका मी मोठा नेता नाही. पण, या चौकशीमुळे उद्या वर्तमानपत्रात नाव येईल. आज मी वाहिन्यांवरही दिसत आहे. त्यामुळे मोठे होण्याची संधी मला मिळाली, असे ठाकूर यांनी सांगितले. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHitendra Thakurहितेंद्र ठाकूरMumbaiमुंबईVasai Virarवसई विरार