शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांच्या पत्नीनं पैसे परत केल्याचा दावा; सौमय्या म्हणाले, "पण हिशोब तर द्यावाच लागेल"

By जयदीप दाभोळकर | Updated: January 15, 2021 11:35 IST

संजय राऊत यांच्या पत्नीनं ५५ लाख रूपये परत केल्याचा करण्यात आला आहे दावा.

ठळक मुद्देपीएमसी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी राऊत यांच्या पत्नीला बजावण्यात आलं होतं समन्सराऊत यांनी ५५ लाख रूपये परत केल्याचा करण्यात आलाय दावा

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसूली संचलनालयानं नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला समन्स बजावलं होतं. संजय राऊत यांच्या पत्नीवर पीएमसी बँकेकडून काही कर्ज घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु आता संजय राऊत यांच्या पत्नीनं बँकेचे ५५ लाख रूपये परत केल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला."संजय राऊत म्हणाले त्यांच्या पत्नीनं पैसे परत केले आहेत. परंतु हिशोब तर द्यावाच लागणार. अखेर संजय राऊत यांना पैसे तर परत करावेच लागले. परंतु त्यांना हिशोबही द्यावाच लागेल," असं किरीट सोमय्या म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हे संपूर्ण प्रकरण पीएमसी बँक घोटाळा प्रकरणाशी निगडीत आहे.  

वर्षा राऊत यांची चार जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेतीन तास चौकशी केली होती. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यावरून वर्षा राऊत यांच्या खात्यावर ५५ लाख रुपये वर्ग करण्यात आले होते. तसेच त्यांच्या चार कंपन्यांतील भागीदारीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांना अटक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला मज्जाव केला आहे. मात्र, त्यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा कायम राहिला आहे.प्रविण राऊत यांची सपत्ती जप्तपीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं प्रविण राऊत यांची ७२ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली होती. या प्रकरणामध्ये ईडीने प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांच्याकडे कोटींची संपत्ती असल्याचा दावाही केला होता. हा पीएमसी बँक कर्ज प्रक्रियेत घोटाळा करून मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जप्त केली होती.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv SenaशिवसेनाBJPभाजपा