शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
2
हो, मलाही शिंदेंच्या शिवसेनेत सहभागासाठी ऑफर; खासदार राजाभाऊ वाजे यांचा गौप्यस्फोट
3
"बंगाली हिंदू बेघर, छावण्यांमध्ये खिचडी खातायत...!"; प. बंगालमधील हिंसाचारावरून मिथुन यांचा ममतांवर प्रहार, म्हणाले...
4
IPL 2025: "पराभवास मीच जबाबदार, मी चुकीचा शॉट खेळलो"; अजिंक्य रहाणे पराभवानंतर निराश
5
४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई
6
"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला
7
ठाणे : बाल आश्रमात २ मुलींवर अत्याचार, २९ पीडित मुलांची केली सुटका; संचालकासह पाच जणांवर गुन्हा
8
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
9
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
10
विशेष लेख: राहुल गांधी म्हणतात, ‘वाट बघेन! मला घाई नाही!’
11
एसटीच्या सवलतींचा महाराष्ट्रातील १८१ कोटी प्रवाशांना लाभ, ६,४९५ कोटींची सवलत; महामंडळाची माहिती
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
13
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
14
ठाणे: चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला न्यायालयाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न
15
अग्रलेख: हा कसला आततायीपणा? तामिळनाडूचा निर्णय देशाहिताचा नाही
16
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
17
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
18
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
19
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
20
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?

भाजप-RSS मध्ये दुरावा? PM नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याने चर्चांना पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:20 IST

PM Narendra Modi Nagpur: गुडीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमध्ये RSS च्या मुख्यालयाला भेट दिली.

PM Narendra Modi Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. दरम्यान, पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात विविध कारणांनी चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे, पंतप्रधान म्हणून गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच नरेंद्र मोदी आरएसएसच्या श्रद्धा केंद्र स्मृतीस्थळावर पोहोचले. या दौऱ्याकडे भाजप आणि आरएसएसमधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाची भेट, ही सामान्य भेट नसून, त्यातून अनेक राजकीय अर्थ काढले जाताहेत. काही काळापूर्वीच अशी चर्चा सुरू झाली होती की, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघत अंतर्गत कलह सुरू आहे. अनेकप्रसंगी भाजप नेते आणि संघाने वेगवेगळे विचार मांडले होते. पण, आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.  या दौऱ्यातून संघ आणि भाजपमधील अंतर कमी होण्याचे संकेतही मिळाले आहेत. 

पंतप्रधानी आठवले जुने दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना आदरांजली वाहिली आणि स्मृती मंदिर येथील अभ्यागत पुस्तकात त्यांचे विचार मांडले. त्यांनी लिहिले की, स्मृती मंदिरात आल्यानंतर मी भारावून गेलो. हे स्थान आपल्याला राष्ट्रसेवेत पुढे जाण्याची प्रेरणा देते. विशेष म्हणजे यावेळी संघप्रमुख मोहन भागवत आणि ज्येष्ठ प्रचारक भैयाजी जोशी हे दोघेही उपस्थित होते. स्मृती मंदिरात श्रद्धांजली वाहल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वयंसेवकांची भेट घेतली आणि त्यांचे जुने दिवस आठवले. त्यांनी संघासोबतचा त्यांचा सहवास आणि अनुभव सांगितला. यावरुन हे स्पष्ट होते की पीएम मोदी आणि संघ यांच्यात घट्ट नाते आणि सखोल संबंध आहे.

सेवा म्हणजे स्वयंसेवकपीएम मोदींनी मंचावरून त्यांचे विचार आणि आरएसएसबद्दलचे त्यांचे विचार सांगितले. पीएम मोदी म्हणाले की, संघ हा भारताचा वटवृक्ष आहे, ज्याच्या फांद्या समाजाच्या अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. सेवा म्हणजे स्वयंसेवक. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उल्लेख केला आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. संघ सतत राष्ट्रसेवेच्या मार्गावर पुढे जात असून समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवत