शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींच्या 8, गडकरीच्या 40 तर योगींच्या 15 सभा; भाजपच्या झंझावाती प्रचाराला सुरावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:58 IST

पंतप्रधान मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा घेणार आहेत. थर, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या राज्यात सर्वाधिक सभा होतील.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काल(29 ऑक्टोबर 2024) उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आता राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपने आपली निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी अन् इतर बडे नेते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.

पंतप्रधान मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा घेणार आहेत. तर, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे राज्यात जास्तीत जास्त जाहीर सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील महाराष्ट्रात एकूण 15 जाहीर सभा घेणार आहेत.

महाराष्ट्रात कोणाच्या किती सभा होणार?पंतप्रधान नरेंद्र मोदी - 8अमित शहा - 20नितीन गडकरी - 40देवेंद्र गडकरी - 50चंद्रशेखर बावनकुळे - 40योगी आदित्यनाथ - 15

प्रामुख्याने दोन आघाड्या मैदानात समोरासमोर महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. यावेळी महाराष्ट्र निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने आहेत. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. 

20 नोव्हेंबर रोजी मतदानमहाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. गेल्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएपासून फारकत घेत राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 

पुढे, जून 2022 मध्ये शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला होता आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या 40 आमदारांसह बंड पुकारले. पुढे भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर, गेल्या वर्षी अजित पवारदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन महायुतीत सामील झाले. आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी