शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 18:56 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आव्हान दिले आहे...

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा जबरदस्त आखाडा रंगला आहे. नेतेमंडळी प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आणि आव्हान-प्रतिआव्हान देतानाही दिसत आहेत. यातच आज, भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आव्हान दिले आहे. राहुल गांधी, कान उघडे ठेऊन ऐका, 'डंके की चोट पर' पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्फचा कायदा बदलणार. आता तुम्ही कुणाच्याही भूमीवर कब्जा करू शकणार नाही." शाह धुळ्यात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

"चारशे-चारशे वर्षांची जुनी मंदिरंही वक्फची संपत्ती झाले..." -शाह म्हणाले, "या देशात, अनेक लोक वक्फ कायद्यामुळे त्रस्त आहेत. नुकतेच कर्नाटकात, तेथील वक्फ बोर्डाने निर्णय केला की, अनेक गावे, संपूर्ण वक्फची संपत्ती आहेत. चारशे-चारशे वर्षांची जुनी मंदिरंही वक्फची संपत्ती झाले, शेतकऱ्यांची शेतीही वक्फची संपत्ती झाली आणि लोकांची घरंही वक्फची संपत्ती झाले. मला सांगा हा वक्फचा कायदा बदलायला हवा की नको? जनतेतून आवाज आला 'हो...'."

"'डंके की चोट पर' PM मोदी वक्फचा कायदा बदलणार" - शाह पुढे म्हणाले, "आमची बदलायची इच्छा आहे, एक विधेयक घेऊन आलो आहोत. पण हे राहुल गांधी आणि पवार विरोध करत आहेत. मी आज सांगून जात आहे. राहुल गांधी, कान उघडे ठेऊन ऐका, 'डंके की चोट पर' पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्फचा कायदा बदलणार. आता तुम्ही कुणाच्याही भूमीवर कब्जा करू शकणार नाही." 

मुस्लीम आरक्षणावरूनही राहुल गांधींवर निशाणा -मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शाह म्हणाले, "काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना हे सर्व उलेमा भेटले आणि म्हणाले, मुस्लिमाना आरक्षण द्यायला हवे. बंधू-भगिनींनो, जर मुसलमानांना आरक्षण द्यायचे असेल तर, एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणातून कापून द्यावे लागेल." यावेळी, धुळे करांनो आपण मुस्लीम आरक्षणासाठी सहमत आहात का? असा प्रश्न शाह यांनी जनतेला केला. यावर जनतेतून आवाज आला 'नाही...'. यावर, शाह म्हणाले, "राहुल गांधी, आज मी धुळ्यातून सांगून जात आहे, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी जरी आली तरीही मुस्लीम आरक्षण देऊ शकणार नाही."  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीMuslimमुस्लीम