शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू मेमोरियल काँग्रेसमुक्त; शहांच्या एंट्रीनंतर तीन काँग्रेस नेते बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 11:36 IST

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीची पुनर्रचना; तीन काँग्रेस नेत्यांचा दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली: नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या (एनएमएमएल) समितीची मोदी सरकारकडून पुनर्रचना करण्यात आली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून याविषयीचा निर्णय घेण्यात आला. एनएमएमएलची पुनर्रचना करताना सांस्कृतिक मंत्रालयानं काँग्रेस नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. एनएमएमएलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेत्यांच्या जागी गीतकार प्रसून जोशी, टीव्ही पत्रकार रजत शर्मा, लेखक अनिर्बान गांगुली यांची निवड करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीच्या समितीमध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे,  करण सिंह आणि जयराम रमेश यांचा समावेश होता. मात्र आता त्यांना वगळण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी या समितीचे अध्यक्ष असून उपाध्यक्षपदाची धुरा राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर आहे. तर अन्य सदस्यांमध्ये सचिदानंद जोशी, शिक्षातज्ज्ञ कपिल कपूर, वैदिक आणि बुद्धिस्ट विचारवंत लोकेश चंद्र, शिक्षातज्ज्ञ मकरंद परांजपे, किशोर मकवाना, कमलेश जोशीपुरा आणि रिजवान कादरी यांचा समावेश आहे. उदारमतवादी व्यक्तीमत्त्वांना नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी समितीत स्थान देण्यात न आल्याची टीका यावरुन काँग्रेसनं केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या स्मृतीप्रित्यर्थ नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीची उभारणी करण्यात आली. या समितीत मोदी, शहांसोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचादेखील समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत अनेकदा नेहरूंच्या परदेश धोरणांवर टीका केली आहे. यावरूनही काँग्रेस आणि भाजपामध्ये अनेकदा संघर्ष झाला आहे.  

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा