शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:02 IST

गजानन किर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत असताना भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी किर्तीकरांवर गंभीर आरोप केले आहेत. 

ईडीच्या कारवाईमुळे शिंदे गटात गेलेल्या गजानन किर्तीकरांनी लोकसभा निवडणूक होताच विरोधी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. ऐक लोकसभा निवडणुकीतही त्यांनी वेगवेगळी वक्तव्ये करून आपण शिंदे गटात बळजबरीने आल्याचे संकेत दिले होते. आता त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत असताना भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी किर्तीकरांवर गंभीर आरोप केले आहेत. 

शिंदे गटात गेल्यामुळे मी कुटुंबात एकटा पडलो. मातोश्रीपासून दुरावल्याचे व कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटात आल्याचे वक्तव्ये किर्तीकरांनी केली आहेत. किर्तीकरांचा मुलगा अमोल किर्तीकर ठाकरे गटाकडून लोकसभा लढवत होता. त्याला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन किर्तीकरांचा डाव होता, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे. यावर किर्तीकरांनी देखील प्रत्युत्तर देत कटकारस्थाने करणे मला जमत नाही ती भाजपाची सवय आहे, असा टोला लगावला आहे. 

एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळविण्यासाठी गजानन किर्तीकर शिवसेनेत आले. उमेदवारी मिळाल्यावर अचानक अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट त्यांनी रचला होता असा माझा आरोप असल्याचे दरेकर म्हणाले होते. यावर उत्तर देताना किर्तीकरांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. अमोलने निवडणूक लढविण्याचे आधीच जाहीर केले होते. तसेच तो शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. माझे निवृत्तीचे वय झाले होते व मुलाविरोधात लढणे योग्य नसल्याने मी लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते, असा खुलासा किर्तीकर यांनी केला आहे. 

मविआला चांगल्या जागा मिळतील - गजानन कीर्तिकरमी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, अशी खंत मतदानानंतर गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. ठाकरेंना सोडून अमोेल जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गजानन कीर्तिकर यांनी २०१९ मध्ये मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून २.६० लाखांच्या मतांच्या फरकाने जिंकली होती. त्यांनी निरूपम यांचा येथे पराभव केला होता. आपण पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून राजधर्माचे पालन करणार असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले होते. परंतु ते प्रत्यक्ष प्रचारात आले नव्हते. यामुळे किर्तीकर आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा असा सल्ला मंत्री दिपक केसरकर यांनी दिला आहे.  

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरamol kirtikarअमोल कीर्तिकरEknath Shindeएकनाथ शिंदेpravin darekarप्रवीण दरेकरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४mumbai-north-west-pcमुंबई उत्तर पश्चिम