पुणो : ‘‘संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुस्तकातील बदनामीप्रकरणी न्यायालयाने लेखक आनंद यादव आणि प्रकाशक सुनील मेहता यांना दोषी ठरवित ‘ संतसूर्य तुकाराम‘ आणि ‘लोकसखा ज्ञानेश्वर ही दोन्ही वादग्रस्त पुस्तके नष्ट करण्याच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही निश्चितच आदर करतो. मात्र त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता, त्यावर कोणताही निर्णय न दिल्याने आम्ही जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहोत.’’ असे संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजीमहाराज मोरे यांनी सांगितले.
‘संतसूर्य तुकाराम’ आणि ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ या पुस्तकांमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांच्याविषयी कपोकल्पित बदनामीकारक मजकूर लिहिल्याबद्दल लेखक आनंद यादव प्रकाशक सुनील मेहता व हक्कदार स्वाती यादव यांच्याविरूद्ध 7 एप्रिल 2क्क्9 रोजी तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंग विश्वनाथ मोरे यांनी दावा दाखल केला होता. 27 मे रोजी याचा निकाल लागला, त्याची प्रत मोरे यांना मिळाली आहे, त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन यांनी पुस्तकातील बदनामीकारक मजकूराबद्दल लेखक व प्रकाशक दोघांनाही 2क् हजार रूपये दंड ठोठावला आहे. मात्र अब्रूनुकसान भरपाई संदर्भात कोणताच निर्णय न दिल्याने याविरूद्ध जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचे संभाजीमहाराज मोरे यांनी स्पष्ट केले. ‘‘ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, मात्र संताविषयी त्यांनी असे बदनामीकारक लेखन करायला नको होते. संतसाहित्याला स्पर्श करण्याचे धाडस केले पण त्यात विकृतपणा मांडला आणि हे लेखक संशोधनात्मक वास्तववादी असल्याचा दावाही त्यांनी केला. यामुळे भावना दुखावल्या आहेत. संतसाहित्य हा वारक:यांचा जीव की प्राण आहे, त्याविषयी चुकीचे लिहिले गेले तर ते खवळणारच’’, असेही त्यांनी स्पष्ट केले.