लोकलवर पत्ते खेळणे जीवावर बेतले
By Admin | Updated: August 18, 2014 04:08 IST2014-08-18T04:08:47+5:302014-08-18T04:08:47+5:30
रविवारी माहीम रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या टपावर पत्ते खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ओव्हरहेड वायरचा जबर शॉक लागला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जबर जखमी झाला.

लोकलवर पत्ते खेळणे जीवावर बेतले
मुंबई : रविवारी माहीम रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या टपावर पत्ते खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ओव्हरहेड वायरचा जबर शॉक लागला. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जबर जखमी झाला.
सुटीच्या दिवशी यार्डात जाऊन खेळण्याची सवय असल्याने नेहमीप्रमाणे धारावी येथे राहणारा अमजद खान (१५) आणि इम्रान सय्यद (११) हे दोघेही रेल्वे यार्डात दुपारी गेले. लोकलच्या टपावर हे दोघेही चढले आणि पत्ते खेळू लागले. अमजद खान याने बाह्या वर करण्यासाठी हात वर करताच त्याला ओव्हरहेडचा शॉक बसला. इम्रानलाही त्याची झळ बसली. यात अमजद शंभर टक्के भाजला, तर इम्रान २५ टक्केच भाजला. ही घटना त्या वेळी एका हमालाने पाहिली आणि ते पुढे धावून गेला. मात्र दोन रुळांच्या मध्ये पाय अडकून ते पडल्याने त्यांनाही मार लागला. परंतु त्याही अवस्थेत त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली.