जनऔषधी केंद्रासह प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था उभारणार - मुख्यमंत्री
By Admin | Updated: May 16, 2016 18:37 IST2016-05-16T18:37:03+5:302016-05-16T18:37:03+5:30
राज्यात शंभर जनऔषधी केंद्र उभारण्यासाठी केंद्र शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून नागपूर येथे मेडिकल डिव्हाईस पार्क आणि औरंगाबाद येथे बल्क ड्रग पार्क उभारले जाणार आहेत

जनऔषधी केंद्रासह प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था उभारणार - मुख्यमंत्री
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 : राज्यात शंभर जनऔषधी केंद्र उभारण्यासाठी केंद्र शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून नागपूर येथे मेडिकल डिव्हाईस पार्क आणि औरंगाबाद येथे बल्क ड्रग पार्क उभारले जाणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन अँड रिसर्च नागपूर येथे केंद्र उभारण्याबरोबरच केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था (सीआयपीईटी) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंत कुमार यांनी आज येथे दिली. या सर्व कामांना येत्या सहा महिन्यात सुरुवात होईल, असेही श्री. अनंत कुमार यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- राज्यातील विविध ठिकाणी 100 जन औषधी केंद्रे उभारणार
- नागपूरमध्ये उभारणार राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था
- नागपुरातील मेडिकल डिव्हाईस पार्कला मंजुरी
- पुणे व जळगावमध्ये प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्थेचे केंद्र
- जळगावमध्ये उभारणार प्लास्टिक पार्क
- औरंगाबादमध्ये बल्क ड्रग पार्क उभारणार
- आरसीएफच्या थलमधील तिसऱ्या प्रकल्पात 13 लाख टन खताची निर्मिती
- केंद्रीय रसायन व खत मंत्री अनंत कुमार यांच्याबरोबर बैठकीत निर्णय