शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

प्लॅस्टिक, टेट्रा पॅकला १ एप्रिलपासून ‘दारूबंदी’

By admin | Published: February 02, 2016 3:54 AM

प्लॅस्टिकची बाटली आणि टेट्रा पॅकचे वेष्टन असलेले मद्य मानवी शरीरास अपायकारक असल्याने व राज्य सरकारच्या महसुलात घट होत असल्याने राज्य सरकारने देशी, विदेशी मद्य काचेच्या बाटलीत

मुंबई : प्लॅस्टिकची बाटली आणि टेट्रा पॅकचे वेष्टन असलेले मद्य मानवी शरीरास अपायकारक असल्याने व राज्य सरकारच्या महसुलात घट होत असल्याने राज्य सरकारने देशी, विदेशी मद्य काचेच्या बाटलीत विकणे बंधनकारक केले आहे. १ एप्रिल २०१६पासून देशी, विदेशी मद्य प्लॅस्टिकची बाटली व टेट्रा पॅकमध्ये विकण्यावर सरकारने बंदी घातली आहे. याबाबत सरकारने अधिसूचना काढल्याची माहिती सरकारी वकिलांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिली.देशी, विदेशी मद्य प्लॅस्टिकच्या बालटीमध्ये किंवा टेट्रा पॅकमध्ये विकण्यास बंदी घालावी, यासाठी ग्लोबल एन्वायरो सोल्युशन्स या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारने ११ जानेवारी २०१६ रोजी ही अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेनुसार देशी, विदेशी मद्य काचेच्या बाटलीत विकणे बंधनकारक केले आहे. तसेच या बाटलीवर ‘फक्त महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता’ असे उमटवणेही सरकारने बंधनकारक केले आहे. अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या बाटलीत आणि टेट्रा पॅकमध्ये मद्य विकण्यास बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. (प्रतिनिधी) > सरकारच्या अधिसूचनेनुसार, देशी मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्या आणि कंटेनर जुने असतात; तसेच प्लॅस्टिकच्या बाटल्यांकरिता वापरण्यात येणारे पदार्थ पर्यावरणासाठी घातक ठरतात. प्लॅस्टिक बाटल्या अविघटनशील आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्याशिवाय प्लॅस्टिक हे अल्कोहोलमध्ये काही प्रमाणात विद्राव्य होत असल्याने मानवी आरोग्यास अधिक अपायकारक ठरते; तसेच प्लॅस्टिक बाटल्या व टेट्रा पॅकमधून अल्कोहोलची अवैधरीत्या तस्करी करण्यात येते. त्यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसतो.हे टाळण्यासाठी १ एप्रिलपासून प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि टेट्रा पॅकमधून देशी, विदेशी मद्य विकण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिल्यावर खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.