‘यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प!’
By Admin | Updated: April 23, 2017 02:24 IST2017-04-23T02:24:33+5:302017-04-23T02:24:33+5:30
गतवर्षी १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करून महाराष्ट्राच्या वनविभागाने एक वेगळा विक्रम निर्माण केला आहे. त्याच्याही पुढे जात यावषीर्ही १ ते ७

‘यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प!’
मुंबई : गतवर्षी १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करून महाराष्ट्राच्या वनविभागाने एक वेगळा विक्रम निर्माण केला आहे. त्याच्याही पुढे जात यावषीर्ही १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
गेल्यावर्षी १ कोटी वृक्ष लावण्याच्या या आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद घेत मुनगंटीवार यांना यावर्षीचा लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आपल्या विभागाने केला असून यासाठी ३ कोटी वृक्ष वनविभागाच्या माध्यमातून तर १ कोटी वृक्ष अन्य विभागांच्या माध्यमातून लावण्याचे नियोजन केले आहे, असे ते म्हणाले. वनविभागाने गेल्यावर्षी प्रमाणे यावषीर्ही ही मोहीम विक्रमी करावी, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे आयोजित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख आणि वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी मुनगंटीवार पुढे म्हणाले, यावर्षीच्या अर्थसंकल्पात वनक्षेत्रातील नागरिकांसाठी शंभर टक्के एलपीजी गॅस देण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध योजनेच्या माध्यमातून मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी करता येईल,
यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)