‘प्लँचेट’ची चौकशी समितीमार्फत व्हावी
By Admin | Updated: July 21, 2014 02:47 IST2014-07-21T02:47:03+5:302014-07-21T02:47:03+5:30
प्लँचेटच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला

‘प्लँचेट’ची चौकशी समितीमार्फत व्हावी
पुणे : प्लँचेटच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्याचा गुन्ह्याच्या तपासावर काय परिणाम झाला याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्वत:हून समिती नेमण्याची गरज होती. मात्र, आम्ही मागणी केल्यानंतर ती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांनी केली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला रविवारी ११ महिने पूर्ण झाले. मात्र, अद्यापही यातील आरोपी आणि सूत्रधार सापडलेले नाहीत. याचा निषेध करण्यास बालगंधर्वजवळील पुलावर निदर्शने करण्यात आली. दिग्दर्शक अतुल पेठे, अंनिसचे सचिव मिलिंद देशमुख, कार्याध्यक्ष अॅड. मनीषा महाजन आदी आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)