शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

विमान प्रवास दुपटीने वाढला

By admin | Updated: October 17, 2014 01:04 IST

दिवाळीनिमित्त लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विमानप्रवास दुपटीने वाढविण्यात आला. याचा लाभ घेत अगोदरच कोटा घेऊन ठेवलेल्या एजंटनी मनमानी सुरू केली आहे. काही तासांच्या अंतरासाठी सुद्धा

एजंटची मनमानी : दिवाळीच्या सुटीमुळे सुरू आहे लूट नागपूर : दिवाळीनिमित्त लोकांच्या गरजा लक्षात घेऊन विमानप्रवास दुपटीने वाढविण्यात आला. याचा लाभ घेत अगोदरच कोटा घेऊन ठेवलेल्या एजंटनी मनमानी सुरू केली आहे. काही तासांच्या अंतरासाठी सुद्धा तिकिटांचे दर वाढविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दिवस, फ्लाईटची वेळ आणि आसन व्यवस्थेनुसारही तिकिटांच्या दरात बदल करण्यात आला आहे. गुरुवारी नागपुरात कार्यरत एका प्रवाशाने इंदोरवरून मुंबईसाठी दुपारच्या फ्लाईटची पोजिशन आॅनलाईन पाहिली असता ५ हजार रुपये भाडे दाखविण्यात आले होते. सायंकाळी त्याच फ्लाईटचे भाडे १० हजार ५०० रुपये झाले. एजंटशी संपर्क साधला असता त्याच फ्लाईटचे भाडे २२ हजार रुपये सांगण्यात आले. विमानाचे हे भाडे २६ आॅक्टोबर रोजीचे सांगण्यात आले आहे.नागपूर ते पुणे साठी असलेल्या विमानाचे सुद्धा दर दिवशी वेगवेगळे भाडे आहेत. शुक्रवारी नागपूर ते पुणेच्या एका फ्लाईटचे भाडे ५८९० रुपये सांगण्यात आले आहे तर २३ आॅक्टोबरनंतर ७१४९ रुपये भांडे सांगितले जात आहे. ही माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील संबंधित विमान कंपण्यांच्या काऊंटरवरूनच देण्यात आलेली आहे. तर एजंटांकडे वेगवेगळे दर आहेत.इतकेच नव्हे तर लो कॉस्ट कॅरियर (एलसीसी) या फ्लाईटच्या तिकिटांचे दर साधारणपणे कमी राहतात. त्याच्या तिकिटांच्या किमती सुद्धा एजंटनी भरमसाट वाढविल्या आहेत. विमानांच्या तिकिटांसोबतच खासगी बसेसची सुद्धा अशीच अवस्था आहे. दिवाळीपूर्वीच खासगी बसेसच्या तिकिटांचे दर दुपटीने वाढले आहेत. दलालांनी प्रवाशांना लुटण्यासाठी आपले नेटवर्क आणखी मजबुत केले आहे. विमान, रेल्वे आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दलालांची करडी नजर आहे. (प्रतिनिधी)कमिशनचा खेळ तिकिटांचे दर वाढण्यामागे कमिशनचा खेळही कारणीभूत आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर एजंटाची नेमणूक करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनवर आॅटो चालक कमिशन एजंटचे काम करीत आहे. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रवाशांशी चर्चा करीत त्यांना प्रवास व थांबण्याच्या ठिकाणांची माहिती देतात. रामदासपेठ, धरमपेठ, सदर, मानस चौक, शंकरनगर, सीए रोड, गणेशपेठ बस स्टॅण्ड, छावणी, गेट नाग रोड, वर्धा रोड आदी ठिकाणी एजंट दिसून येतात. खासगी ट्रॅव्हल्ससाठी तर दलालांची संख्या अचानक वाढली आहे.