बॉम्बच्या अफवेमुळे विमान उतरवले

By Admin | Updated: January 24, 2016 00:10 IST2016-01-24T00:10:10+5:302016-01-24T00:10:10+5:30

भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणाऱ्या गो-एअरच्या विमानात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने शनिवारी सकाळी खळबळ उडाली. अखेर ही अफवा असल्याचे उघड झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Plane fired by bomb rumors | बॉम्बच्या अफवेमुळे विमान उतरवले

बॉम्बच्या अफवेमुळे विमान उतरवले

नागपूर : भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणाऱ्या गो-एअरच्या विमानात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने शनिवारी सकाळी खळबळ उडाली. अखेर ही अफवा असल्याचे उघड झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तपास यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
गो-एअर कंपनीच्या भुवनेश्वर ते मुंबई या मार्गावरील विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन भुवनेश्वर विमानतळावर आला. या घटनेची सूचना नागपूर विमानतळ प्राधिकरण आणि नागपूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर विमान सकाळी ९.३५ वाजता नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. विमानाभोवती सुरक्षा पथकाने कडे केले. सीआयएसएफच्या बॉम्ब निरोधक पथकाने १५३ प्रवाशांना खाली उतरवून विमानाची कसून तपासणी केली. या पथकाला कोठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यानंतर दुपारी १२.२२ वाजता विमान नागपूरहून भुवनेश्वरकडे रवाना झाले.

Web Title: Plane fired by bomb rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.