पशुवैद्यकीय अधिका-यांच्या जागा महिनाभरात भरणार
By Admin | Updated: April 6, 2015 23:15 IST2015-04-06T23:15:28+5:302015-04-06T23:15:28+5:30
राज्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून येत्या महिन्याभरात

पशुवैद्यकीय अधिका-यांच्या जागा महिनाभरात भरणार
मुंबई : राज्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्या भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून येत्या महिन्याभरात ९० टक्के जागा भरल्या जातील, अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
राज्यात चाऱ्याची टंचाई असल्याच्या अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर अनेक सदस्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. विदर्भात जनावरांना काय खायला द्यायचे व कोणते खाद्य दिले तर काय नुकसान होते, यासाठी जनजागृती करण्याची मागणीही सदस्यांनी यावेळी केली. राज्यात चारा उपलब्ध व्हावा म्हणून सरकार केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियांनातर्गत विविध वैरण विकास कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडून आवश्यकतेप्रमाणे निधी उपलब्ध करुन देईल असेही खडसे यावेळी म्हणाले. राज्यात अॅनीमल वेलफेअर बोर्ड अद्याप अस्तित्वात आलेले नाही असा मुद्दा मंगलप्रसाद लोढा यांनी उपस्थित केला तेव्हा हे बोर्ड लवकर अस्तित्वात येईल आणि त्यावर इच्छा असेल तर आपली देखील निवड केली जाईल.