चिपळूणजवळील मल्ल्यांची जागा जप्त

By Admin | Updated: March 22, 2016 04:22 IST2016-03-22T04:22:00+5:302016-03-22T04:22:00+5:30

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची एक एकर जागा चिपळूणच्या तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आली.

The place of malla near Chiplun seized | चिपळूणजवळील मल्ल्यांची जागा जप्त

चिपळूणजवळील मल्ल्यांची जागा जप्त

चिपळूण : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची एक एकर जागा चिपळूणच्या तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आली. ही कंपनी आतापर्यंत बंदच होती. या एक एकर जागेवर सुमारे १० ते १२ पडक्या इमारती आहेत.
चिपळूण तालुक्यातील पिंपळ बुद्रुक गावी मल्ल्या यांची एक एकर जमीन आहे. या जमिनीवर युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड नावाची कंपनी उभी होती. ही जागा बिनशेती करण्यात आली होती. मात्र, गेली दोन वर्षे बिनशेतीचा सुमारे ४५ हजारांचा कर मल्ल्या यांनी थकवला होता. त्यामुळे चिपळूणच्या महसूल प्रशासनाने ही जमीन जप्त करण्याची कारवाई केली.
तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळकवणेचे मंडल अधिकारी दिवाकर केळुस्कर, तलाठी शुभांगी गोंगाणे यांनी ही मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: The place of malla near Chiplun seized