आता फक्त 4 मिनिटात मिळणार पिझ्झा

By Admin | Updated: May 17, 2016 17:43 IST2016-05-17T17:43:22+5:302016-05-17T17:43:22+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एनी टाईम पिझ्झा (एटीपी) मशीन बसवण्यात आली आहे ज्यामुळे फक्त 4 मिनिटांत पिझ्झा मिळणार आहे

Pizza will be available in just 4 minutes | आता फक्त 4 मिनिटात मिळणार पिझ्झा

आता फक्त 4 मिनिटात मिळणार पिझ्झा

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 17 - पिझ्झा खायची इच्छा झाली असेल तर ऑर्डर करणे किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाणे हे पर्याय आपण निवडतो. पण ऑर्डर केल्यानंतरही अर्धा तास वाट पाहावी लागते त्यामुळे झटपट खायचं असेल तर इतर पर्याय निवडणे सोयीचे ठरते. मात्र मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आता फक्त 4 मिनिटांत पिझ्झा मिळणार आहे. 
 
तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे ? या हॉटेलमध्ये एनी टाईम पिझ्झा (एटीपी) मशीन बसवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे एटीएममध्ये आपण कार्ड स्वॅप करुन पैसे काढतो. त्याचप्रमाणे या मशीनमध्ये पैसे टाकून आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत ज्यानंतर अवघ्या 4 मिनिटात तुमचा पिझ्झा तयार असणार आहे. 
 
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एनी टाईम पिझ्झा (एटीपी) मशीनचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्र वाघ आणि गोव्याचे माजी मुंख्यमंत्री दिगंबर कामत उपस्थित होते
 

Web Title: Pizza will be available in just 4 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.