पिंपरी-चिंचवडमध्ये दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या
By Admin | Updated: May 12, 2017 14:12 IST2017-05-12T14:12:15+5:302017-05-12T14:12:15+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकात एका तरुणाच्या डोक्यात दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

पिंपरी-चिंचवडमध्ये दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 12 - पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौकात एका तरुणाच्या डोक्यात दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (12 मे) सकाळी उघडकीस आली.
पंडित पेट्रोल पंप मागील परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसले आहे.
या तरुणाला अतिशय निर्घृण पद्धतीनं मारहाण करण्यात आली आहे.
त्याचा चेहरा दगडानं ठेचून त्याचा संपूर्णतः चेंदामेंदा करण्यात आला आहे. यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवणं पोलिसांना कठीण होत आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे व उंची 5 फूट 4 इंच आहे. वाकड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून विच्छेदनासाठी पाठवला आहे.
हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली असावी, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, तरुणाची हत्या मध्यरात्री झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.