शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 23:49 IST

नियोजित दौरा उरकून एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहचले होते. त्याठिकाणी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील त्यांच्यासोबत होते.

जळगाव - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगर येथे होते. दौरा आटपून ते मुंबईसाठी रवाना होण्यासाठी विमानतळावर निघाले मात्र तिथे पोहचताच विमानाच्या पायलटने उड्डाण करण्यास नकार दिला. जळगाव विमानतळावर हा सगळा प्रकार घडला. जवळपास ४५ मिनिटे एकनाथ शिंदे यांना विमानतळावरच ताटकळत राहावे लागले. त्यानंतर पायलटची समजूत घालण्यात आली मग त्याने विमान उड्डाण करण्यास होकार दिला. ४५ मिनिटांच्या या हायव्हॉल्टेज ड्रामामुळे विमानतळावर सगळेच अवाक् झाले.

नियोजित दौरा उरकून एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहचले होते. त्याठिकाणी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील त्यांच्यासोबत होते. यावेळी विमानाच्या पायलटने उड्डाण करण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ उपमुख्यमंत्री शिंदेपासून इतर मंत्र्‍यांची पंचाईत झाली. गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी पायलटची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तब्येतीच्या कारणास्तव पायलटने उड्डाण करण्यास नकार दिला. सलग १२ तास उड्डाण केल्यानं पायलटने विमान उडवण्यास नकार दिला.

या प्रकारावर गिरीश महाजन म्हणाले की, पायलटनं प्रकृतीचं कारण दिले, तब्येतीशिवाय त्यांच्या काही वेळेचीही अडचण होती. तांत्रिक अडचणीमुळे आम्ही त्यांच्या विमान कंपनीशी बोललो. कंपनीने त्यांच्या भाषेत पायलटला सांगितले. विमान आता उडालेले आहे. एकनाथ शिंदे एका तासात मुंबईला पोहचतील असं त्यांनी म्हटलं. मात्र पायलटने विमान उड्डाण करण्यास नकार दिल्याने विमानतळावर नेत्यांचा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे यांच्या विमानाचा पायलट १२ तासांहून अधिक विमान चालवत होता त्यामुळे त्याला थकवा आला होता. तब्येतीचे कारण देत त्याने विमान उड्डाण करण्यास नकार दिला. त्यामुळे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी त्याची समजूत काढली. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनीही पायलटची समजूत काढली. या प्रकारामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा ताफा विमानतळावरच अडकला होता. विमानतळावरील वेटिंग रुममध्ये सगळे ताटकळत बसले होते. पायलटच्या तपासणीसाठी यावेळी डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर ४५ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांना घेऊन विमान मुंबईसाठी रवाना झाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGirish Mahajanगिरीश महाजनGulabrao Patilगुलाबराव पाटील