पानसरेंना मारणाऱ्यांना गोळ्या घाला - उदयनराजे
By Admin | Updated: February 23, 2015 02:35 IST2015-02-23T02:35:09+5:302015-02-23T02:35:09+5:30
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे ही माणसे समाज प्रबोधनाचे काम करत होती. त्यांच्यावर गोळीबार होणे ही शोकांतिका आहे.

पानसरेंना मारणाऱ्यांना गोळ्या घाला - उदयनराजे
पुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे ही माणसे समाज प्रबोधनाचे काम करत होती. त्यांच्यावर गोळीबार होणे ही शोकांतिका आहे. सरकार कोणते होते, याच्याशी मला देणे-घेणे नाही. पानसरेंचे मारेकरी सापडल्यास त्यांना तातडीने गोळ्या घाला, असे मत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शिवाजी महाराज हे सर्वसमावेशक होते हीच भूमिका पानसरेंनीही मांडली, असे सांगून ते म्हणाले, सध्या पोलिसांचा वचकच राहिला नाही. मारेकरी सापडत नाहीत. सापडले तर त्यांना जामीन मिळतो. पहिल्यांदा आपले कायदे कडक करायला हवेत.
...तर नक्षली चळवळीचे नेतृत्व करेन
जमीन सुधारणा विधेयकाचा मुद्दा आता पेटणार आहे. मी याबाबत तज्ज्ञांशी आणि चहावाल्यांशीही चर्चा केली. चहावाल्यांचाही याला विरोध आहे. इतरांसाठी एमपी म्हणजे मेंबर आॅफ पार्लमेंट (खासदार), पण मी म्हणजे मिलिट्री पोलीस. इतका राग येतोय की, नक्षली चळवळीचे नेतृत्व करायला मागेपुढे बघणार नाही, असेही उदयनराजे म्हणाले.