मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या पुलावर खड्डयांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:12 IST2017-07-24T18:12:22+5:302017-07-24T18:12:22+5:30
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील वलवण व कुणेगाव पूलांसह दस्तुरी गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून मार्गाची चाळण झाली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या पुलावर खड्डयांची चाळण
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 24 - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील वलवण व कुणेगाव पूलांसह दस्तुरी गावच्या हद्दीत अनेक ठिकाणी पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून मार्गाची चाळण झाल्याने जलद व सुरक्षित प्रवासासाठी संबोधला जाणारा मार्ग सध्या असुरक्षित बनला असून, अपघातांना निमंत्रण देणारा ठरला आहे. यामुळे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खड्ड्यांमुळे धोकादायक झालेल्या परिसरात आपल्या वाहनांच्या वेगावर अंकुश ठेवून, सुरक्षित प्रवास करावा.
जलद व सुरक्षित प्रवासी मार्ग म्हणून संबोधला जाणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा स्थापनेपासूनच अनेक कारणे व विविध अपघात आणि दुर्घटनांनी चर्चेत राहिला आहे. मागील काही दिवसांपासून लोणावळा खंडाळा घाटमाथा परिसरात कोसळत असलेल्या पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे. तसेच मार्गावरील सिमेंटच्या अनेक ब्लॉकमध्ये मोठे अंतर तसेच चढउतार निर्माण झाले आहे. यामुळे अशी ठिकाणे अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. मुंबईहून पुण्याकडे येताना खंडाळा (बोरघाट) घाटातील दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस किलोमीटर क्रमांक ४३ ते ४४ दरम्यान मार्गावरील सिमेंटचे ब्लॉक खचले असून, त्यांना मोठ मोठ्या चिरा पडल्या आहेत. यामुळे याठिकाणी अनेकवेळा वेगात आलेली हलकी व अवजड वाहने आदळतात.
त्याचप्रमाणे विशेषता खंडाळा व लोणावळ्या जवळील कुणे व वलवण पुलावर मोठ मोठे खड्डे पडले असून, पुलावरील मार्गाची अक्षरशा चाळण झाली आहे. येथील मोठ मोठ्या खड्ड्यांतील लोखंडी सळईयांनी (गज) डोके वर काढले असून, काही ठिकाणी त्या मोकळ्या झाल्या आहेत. वलवण पुलावर तर वाहन चालकांना कोणता खड्डा कसा चुकवायचे हे आव्हान त्यांच्या पुढे उभे राहते. इतर ठिकाणी सुसाट वेगानी येणारी वाहने वलवण पुलावर प्रवेश करताच समोर पडलेल्या खड्ड्यांची चाळण पाहून त्यांची गाळणच होते. जे कोणी खड्ड्यांना न जुमानता सुसाट जातात त्यांना तर आई आणि देवच आठविल्याशिवाय राहत नसेल अशी दैयनिय अवस्था वणवण पुलावरील मार्गाची झाली आहे. रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीने सदर ठिकाणच्या खड्ड्यांची वेळेत व तत्काळ दखल न घेतल्यास प्रवाशांना मोठ्या अपघाती दुर्घटनेला सामोरे जावे लागेल. जोपर्यंत वलवण पुलावर खड्ड्यांचे सावट आहे. तो पर्यंत वाहन चालक व प्रवाशांनी वेगावर ताबा ठेवून वाहने सावकाश चालवून आपला प्रवास सुखाचा करावा.