दुकानाचा भाग कोसळून एक ठार
By Admin | Updated: July 20, 2016 05:41 IST2016-07-20T05:41:50+5:302016-07-20T05:41:50+5:30
शहरातील रस्ता रुंदीकरणातील अर्धवट तुटलेली दुकाने जीवघेणी ठरत आहेत.

दुकानाचा भाग कोसळून एक ठार
उल्हासनगर : शहरातील रस्ता रुंदीकरणातील अर्धवट तुटलेली दुकाने जीवघेणी ठरत आहेत. टीलसन मार्केट येथील एका दुकानाचा तुटलेला भाग दुचाकीस्वार अशोक पाल (४०) याच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बाधित दुकानदांराच्या मागणीनुसार पर्यायी जागा पालिकेने दिली नसल्याने रस्त्याच्या बाजूला अर्धवट पाडलेली दुकाने तशीच आहेत. दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शिवाजी चौक परिसरातील टिलसन मार्केट जवळील एका अर्धवट तुटलेल्या दुकानाचा काही भाग मंगळवारी अचानक दुपारी दुचाकीस्वार पाल यांच्या अंगावर पडला. या प्रकरणी पलिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची व नुकसानभरपाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
अर्धवट भाग
पाडण्याची मागणी
पालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकाराने पुन्हा अंबरनाथ-कल्याण रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून अर्धवट तुटलेली दुकाने जमीनदोस्त करण्याची मागणी होत आहे.