बीडमध्ये पिस्तुलाच्या धाकाने साडेदहा लाख लुटले

By Admin | Updated: October 26, 2014 01:10 IST2014-10-26T01:10:15+5:302014-10-26T01:10:15+5:30

दिवाळीच्या धामधुमीतच गजबलेलेल्या ठिकाणी असलेल्या भांडय़ाच्या दुकानात दरोडेखोरांनी ‘फिल्मीस्टाईल’ लूट केली.

Pidel's assassination in Beed looted half a million | बीडमध्ये पिस्तुलाच्या धाकाने साडेदहा लाख लुटले

बीडमध्ये पिस्तुलाच्या धाकाने साडेदहा लाख लुटले

बीड : दिवाळीच्या धामधुमीतच गजबलेलेल्या ठिकाणी असलेल्या भांडय़ाच्या दुकानात दरोडेखोरांनी ‘फिल्मीस्टाईल’ लूट केली. हवेत दोन गोळ्या झाडून दहशत निर्माण करणा:या दरोडेखोरांनी व्यापा:याच्या कानशिलावर पिस्तुल लावून साडेदहा लाख रुपये घेऊन पोबारा केला. हा थरार शहरातील माळीवेस ते सावतामाळी चौक रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडला. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत केवळ दोन तासांतच आठवले गँगमधील सनी व आशिष आठवले या भावांना बेडय़ा ठोकल्या. 
सुजीत काटकर यांचे राजेश स्टील हे भांडय़ाचे दुकान आहे. शुक्रवारी दिवसभर व्यवसाय केल्यावर काटकर हे दिवाळी असल्याने दुकान साडेआठ वाजताच बंद करण्याच्या बेतात होते. सुजीत व त्यांचे वडील सुरेंद्र हे हिशेबात मगA होते. इतक्यात एका जीपमधून सहा जण आले. त्यांनी दारातूनच गावठी पिस्तुलातून एक गोळी हवेत झाडली. त्यानंतर दरोडेखोरांनी थेट काटकर पिता-पुत्रंकडे धाव घेत त्यांना मारहाण केली. त्यात सुरेंद्र हे जखमी झाले. तर दरोडेखोरांनी सुजीत यांच्या डोक्याला पिस्तुल रोखून त्यांच्या खिशातील गल्ल्याची चावी हिसकावून घेतली. गल्ल्यातील 1क् लाख 54 हजार काढून पळ काढला. त्यांनतर काटकरांनी शहर पोलिसांना पाचारण केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Pidel's assassination in Beed looted half a million