RSSच्या शारीरिक वर्गाचा भुसावळमध्ये शुभारंभ

By Admin | Updated: November 4, 2016 16:43 IST2016-11-04T16:43:08+5:302016-11-04T16:43:08+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय शारीरिक वर्गाला आज ४ नोव्हेंबर पासून शहरातील बियाणी मिलटरी स्कूलमध्ये प्रारंभ झाला.

The physical body of RSS launched in Bhusawal | RSSच्या शारीरिक वर्गाचा भुसावळमध्ये शुभारंभ

RSSच्या शारीरिक वर्गाचा भुसावळमध्ये शुभारंभ

>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 04 -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय शारीरिक वर्गाला आज ४  नोव्हेंबर पासून शहरातील  बियाणी मिलटरी स्कूलमध्ये प्रारंभ झाला.
पहाटे ५ वाजता  रा.स्व.संघाचे सरकार्यावाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.या वर्गासाठी देशभरातील ४१ प्रांतातील ४६० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशी खेळ, समता, संचलन, व्यायामयोग, सूर्य नमस्कार, दंड, नियुद्ध, विविध प्रकारचे खेळ आदी विविध शारीरीक अभ्यासक्रम घेण्यात आले. ६ रोजी रविवारी   राष्टÑीय स्वयंसेक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत येणार आहेत ते ६  ते ८ नोव्हेंबर असे तीन दिवस  बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये मुक्कामाला राहतील.   वर्गात सहभागी  देशभरातील ४६० प्रतिनिधींना ते मार्गदर्शन करतील.

Web Title: The physical body of RSS launched in Bhusawal