शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

शस्त्रबंदीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याचे तलवारीसह फोटोसेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 12:53 IST

भाजपचा तालुका उपाध्यक्ष बोडखे याने हातात तलवार घेऊन उभा असलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर ही अजून कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही.

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळताच भाजपमधील कार्यकर्ते आणि नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली असल्याचे दिसत आहे. औरंगाबादच्या पैठणमधील भाजप तालुका उपाध्यक्षांंच्या  वाढदिवसाला चक्क तलवारीने केक कापण्यात आला आहे.  वाढदिवसाला हातात तलवार घेऊन उभा असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. विशेष म्हणजे जिल्हात शस्त्रबंदी कायदा लागू आहे .

 सैराट चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून तरुणाईमध्ये वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याचा वेगळीच क्रेझ निर्माण झाली. ही क्रेज राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पहायला मिळत आहे. पैठण येथील भाजपच्या विद्यार्थी मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष करण बोडखे यांनी आपल्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, हातात तलवार घेऊन फोटोसेशन करण्यात आल्याचे फोटो बोडखे यांनी आपल्या फेसबुकवरून व्हायरल केली आहेत. यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे हे पण त्याठिकाणी उपस्थित होते.

 

प्रदेश उपाध्यक्ष यांच्या समोर भाजपचा तालुका उपाध्यक्ष जिल्हात शस्त्रबंदी लागू असताना सुद्धा खुलेआम तलवार हातात घेऊन फोटोसेशन करत असताना या फोटोतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपचे पदाधिकारीच कायदा हातात घेत असेल तर 'देशाला अच्छे दिन' येतील असं वाटत नाही.

भाजपचा तालुका उपाध्यक्ष बोडखे याने हातात तलवार घेऊन उभा असलेले फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर, अजून ही कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याबरोबर स्वताला पारदर्शक म्हणणाऱ्या भाजपकडून या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.