उघड्यावर शौचास जाणा-यांची वरात आणि होर्डींगवर फोटो

By Admin | Updated: September 30, 2015 13:48 IST2015-09-30T13:48:51+5:302015-09-30T13:48:51+5:30

उघड्यावर शौचास जाणा-यांची वरात व होर्डिंग फोटो लावण्याची भन्नाट मोहीम सोलापूरमधील सांगोला नगरपरिषदेने सुरु केली आहे.

Photographs on the open to the toes and the hoardings on the open | उघड्यावर शौचास जाणा-यांची वरात आणि होर्डींगवर फोटो

उघड्यावर शौचास जाणा-यांची वरात आणि होर्डींगवर फोटो

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. ३० -  उघड्यावर शौचावर जाऊ नका असे आवाहन सरकारतर्फे नेहमीच केले जात असले तरी आजही उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रकार बंद होताना दिसत नाही. सोलापूरमधील सांगोला नगरपरिषदेने या समस्येवर एक भन्नाट उतारा शोधला आहे. उघड्यावर शौचाला जणा-यांचे छायाचित्र नगरपरिषदेसमोरील फलकावर झळकत असून एखादा व्यक्ती उघड्यावर शौचाला जाताना रंगेहाथ पकडला गेल्यास त्याची वाजत गाजत मिरवकणूकच काढली जाते. 
उघड्यावर शौचास गेल्याने आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांची माहिती प्रशासनाकडून वेळोवेळी दिली जाते. आवाहन करुन, जनजागृती मोहीम राबवूनही अजूनही या प्रकारांवर लगाम लावण्यात अपयशच येते. सांगोला नगरपरिषदेतही अनेक भागांमध्ये ही समस्या बघायला मिळते. मात्र आता यावर प्रशासनाने एक आगळीवेगळी योजनाच सुरु केली आहे. नगरपरिषदेसमोर एक मोठा फलक लावण्यात आला असून या फलकावर उघड्यावर शौचावर जाणा-यांचे फोटो लावले जातात. भरचौकात फोटो झळकल्याने या मंडळींची नाचक्की होते. तर एखादा व्यक्ती टमरेल घेऊन उघड्यावर शौचास जाताना रंगेहाथ पकडला गेल्यास त्याची वाजत गाजत मिरवणूक निघते. या महाशयांना वाजत गाजत थेट घरापर्यंत सोडण्यात येते. नगरपरिषदेच्या या मोहीमुळे उघड्यावर शौचास जाण्याचे आता तरी बंद होतील अशी आशा प्रशासनाला आहे. 

Web Title: Photographs on the open to the toes and the hoardings on the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.