दहावीच्या कलअहवालाच्या गुणपत्रिकेत शिक्षण मंत्र्यांचा फोटो
By Admin | Updated: June 15, 2016 21:33 IST2016-06-15T21:10:54+5:302016-06-15T21:33:10+5:30
दहावीच्या कलअहवालच्या गुणपत्रिकेत शिक्षण मंत्र्यांचा फोटो प्रसिद्ध झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

दहावीच्या कलअहवालाच्या गुणपत्रिकेत शिक्षण मंत्र्यांचा फोटो
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 15 - राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल चाचणी परीक्षेच्या अहवालावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा फोटो (छायाचित्र) मंडळाने प्रकाशित केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दहावीच्या कलअहवालच्या गुणपत्रिकेत शिक्षण मंत्र्यांचा फोटो प्रसिद्ध झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक संघटनांनी हा कसला आदर्श, असा सवाल करीत शिक्षणमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.
राज्यातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने विविध प्रयोग केले. यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अहवाल गुणपत्रिकेसह बुधवारी वितरीत करण्यात आला. कल चाचणी अहवालावर शिक्षणमंत्री तावडे यांचा फोटो असल्याने काही शिक्षक संघटनांनी यावर आक्षेप नोंदविला आहे. शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारणेवर आजवर राज्यातील अनेक माजी शिक्षणमंत्र्यांनी भर दिला आहे. मात्र तावडे यांनी कल चाचणी अहवालावर स्वत:चा फोटो छापून शिक्षण क्षेत्राचा उपयोग राजकीय प्रचार-प्रसारासाठी करीत आहेत का, असाही आक्षेप घेण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी अनेक चांगले शिक्षणमंत्री होऊन गेलेत. विद्यार्थी व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी यापूर्वीसुद्धा अनेक उपक्रम राबवण्यात आले. परंतु कुणीही अशा प्रकारे स्वतःचा फोटो छापला नाही. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी फोटो छापून प्रसिद्धी मिळवण्याचा केलेला उपद्व्याप निषेधार्य असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागली आहे.