ऑनलाइन लोकमतसाखरखेर्डा (बुलडाणा), दि. १९ : येथील सोमेश डिजिटल स्टुडिओ मध्ये फोटोग्राफर म्हणून काम करीत असलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 19 अॉगष्ट रोजी दुपारी दीड वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक अण्णाभाऊ साठे नगरात राहणाऱ्या मंगल रमेश पारधे वय 23 याची आई सिंधुताई यांना घरकाम करताना विजेचा शॉक लागल्याने त्यांना डॉ किशोर अग्रवाल यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान मंगल यास ही माहिती कळताच तो शिताफीने दवाखान्यात गेला.
मात्र सौम्य धक्का असल्याने डॉक्टरांनी मंगलच्या आईला ताबडतोब सुटी दिली दरम्यान आईला घेऊन मंगल घरी गेला व कोणत्या वायरचा शॉक लागला याची पडताळणी करत असताना मंगललाच जबर शॉक लागला. दरम्यान तात्काळ त्याच्या आईने आरडाओरडा केला व आजूबाजूच्या लोकांनी त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने गांवात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.