शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

छायाचित्र प्रदर्शनातून खाडी सफारी

By admin | Published: April 26, 2016 4:10 AM

ठाण्याला वरदान म्हणून लाभलेल्या खाडीतील जैवविविधता येथील कलारसिकांनी अनुभवली, ती छायाचित्र प्रदर्शनातून.

ठाणे : ठाण्याला वरदान म्हणून लाभलेल्या खाडीतील जैवविविधता येथील कलारसिकांनी अनुभवली, ती छायाचित्र प्रदर्शनातून. वीकेण्डला या प्रदर्शनातून खाडी सफारी करत असल्याचा प्रत्यय आला. तीन दिवसांत तब्बल ४०० हून अधिक ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्यक्षात खाडी सफारीची इच्छा व्यक्त केली. ठाण्याच्या खाडीविषयी जनजागृती व्हावी व जैवविविधता नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने स्वच्छ खाडी अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून मंडळाने स्वराज कट्ट्याच्या सहकार्याने या वीकेण्डला ठाणे पूर्व येथील खुल्या कलादालनात ठाणे खाडीतील जैवविविधता विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवले होते. पर्यावरण अभ्यासक प्रकाश जोशी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. खाडीतील प्राणी, पक्षी, कीटक, फुलपाखरे, खारफुटी आदी १५० छायाचित्रे प्रदर्शनात मांडली होती. हौशी छायाचित्रकारांनी खाडीत जाऊन छायाचित्रे काढली आहेत. खाडीतील पक्ष्यांची छायाचित्रे कलारसिकांच्या सर्वाधिक पसंतीस पडली. सुटी पडल्याने प्रदर्शनाला येणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. ठाणे खाडीतील जैवविविधता विविध मार्गाने पोहोचवणे, हा आमचा मानस आहे. प्रदर्शन पाहिल्यावर अनेकांनी प्रत्यक्षात खाडी सफारीची इच्छा व्यक्त केली. तसेच, सर्वांनीच खाडीत असलेली जैवविविधता पाहून आश्चर्य व्यक्त केल्याचे मंडळाच्या सचिव संगीता जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याआधी कापूरबावडी येथील कलाभवनात हे प्रदर्शन झाले होते. त्या वेळी ५०० हून अधिक ठाणेकरांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी)