शिर्डी साई मंदिराला देणगीत दोन लाखांची फोटो फ्रेम
By Admin | Updated: July 7, 2016 17:04 IST2016-07-07T17:04:50+5:302016-07-07T17:04:50+5:30
तिरुपती येथील साई गणेश क्रिएशनचे बी.कालेश्वर यांनी सुमारे २ लाख किमतीची फोटो फ्रेम साई संस्थानाला देणगी म्हणून दिली आहे

शिर्डी साई मंदिराला देणगीत दोन लाखांची फोटो फ्रेम
>ऑनलाइन लोकमत -
शिर्डी, दि. 07 - तिरुपती येथील साई गणेश क्रिएशनचे बी.कालेश्वर यांनी सुमारे २ लाख किमतीची फोटो फ्रेम साई संस्थानाला देणगी म्हणून दिली आहे. संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांच्याकडे हा फोटो सुपूर्त करण्यात आला आहे.
श्री साईबाबा समाधीची प्रतिकृती असलेल्या या फोटोत विविध रंगाचे एलईडी लाईटची विद्युत रोषणाई तसंच आरती आणि मंत्रोच्चार सुविधा आहे. विशेष म्हणजे रिमोट तसेच स्मार्ट फोनवरून हा फोटो कंट्रोल करण्याची सुविधा आहे. यावेळी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता रघुनाथ आहेर, साई गणेश क्रिएशनचे कारागीर लोकनाथ व नागराज आदी उपस्थित होते.