शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

By हेमंत बावकर | Updated: November 5, 2025 12:40 IST

State Transport, ST Bus: एसटी बसच्या चालकाने आणि वाहकांसह सहप्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे.

- हेमंत बावकर

कार्तिकी एकादशीला फलटण आगारातून पंढरपुरला निघालेल्या एसटी बसच्या चालकाने आणि वाहकांसह सहप्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे. कार्तिकी एकादशीला पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक जास्त असूनही प्रवासी अत्यवस्थ झाल्याचे समजताच एसटी चालकाने प्रसंगावधान राखत वेगाने नातेपुते गाठत प्रवाशाला वाचविले आहे. प्रवाशांनी संकटात विठ्ठलच धावून आला, असे म्हणत या चालक आणि वाहकाचे आभार मानले आहेत. 

आज एसटी संकटात आहे, अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नाहीत. तरीही एसटीचे कर्मचारी आपले काम करत असतात. कार्तिकी एकादशीला फलटणच्या आगाराची एसटी बस सकाळी पंढरपूरला निघाली होती. यामध्ये एमएसईबीचे माजी अधिकारी भरत भोसले देखील पंढरपूरल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले होते. बरडच्या पुढे जाताच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सहप्रवाशाला त्यांनी आपली तब्येत बिघडत असल्याची कल्पना दिली. त्याने एसटीच्या वाहकाला गाठत त्याला भोसले यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले. 

वाहकाने प्रसंगावधान राखत चालकाला याची माहिती दिली. बरड ते नातेपुते हे अंतर साधारण २४ किमीचे आहे. या दिवशी रस्त्यावर वर्दळही नेहमीपेक्षा जास्त होती. प्रवाशाचे प्राण वाचविण्यासाठी चालक आणि वाहकाने काहीशी वेगाने गाडी हाकली आणि नातेपुते गाठले. नातेपुतेच्या स्टँडवर गाडी येताच रिक्षा चालकाला गाठून सहप्रवाशांच्या मदतीने चालक, वाहक यांनी प्रवासी भोसले यांना वैद्यकीय मदत मिळण्याची सोय केली. या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचे प्राण वाचले. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली. 

रिक्षाचालकाने नातेवाईकांशी साधला संपर्क...एसटीचा प्रवासी अत्यवस्थ अवस्थेत रिक्षात बसला होता, रिक्षाचालक हॉस्पिटलमध्ये नेत होता, तेवढ्यात प्रवाशाच्या पुतण्याचा फोन मोबाईलवर आला. रिक्षाचालकाने लागलीच रिक्षा थांबवून त्यांना याची माहिती दिली. सुदैवाने दुसरा पुतण्या डॉक्टर होता, रिक्षावाल्याला त्याने एका डॉक्टरकडे त्यांना नेण्यास सांगितले. त्या हॉस्पिटलला संपर्क साधून डॉक्टरांना याची कल्पना देण्यात आली होती. सर्व वेळ साधून आल्याने व या सर्वांच्या प्रयत्नाने आपले प्राण वाचल्याचे सांगत भोसले यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Quick-thinking bus crew saves ex-MSEB officer's life near Pandharpur.

Web Summary : A Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) bus driver and conductor swiftly aided a former MSEB officer who fell ill en route to Pandharpur. Their timely action ensured he received prompt medical attention, saving his life with help from a rickshaw driver.
टॅग्स :state transportएसटीBus Driverबसचालकhospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर