मुलगी झाली म्हणून पेटविले!

By Admin | Updated: April 26, 2016 05:58 IST2016-04-26T05:58:28+5:302016-04-26T05:58:28+5:30

वानटाकळी येथे मुलगी झाली म्हणून एका विवाहितेला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

Petted as the daughter went! | मुलगी झाली म्हणून पेटविले!

मुलगी झाली म्हणून पेटविले!

अंबाजोगाई (बीड) : वानटाकळी येथे मुलगी झाली म्हणून एका विवाहितेला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा घडली.
वंदना कृष्णा राठोड असे तिचे नाव असून दोन वर्षांपूर्वी कृष्णासोबत तिचे लग्न झाले होते. तीन महिन्यांपूर्वी वंदनाने मुलीला जन्म दिला. पहिली मुलगीच झाली म्हणून सासरचे तिचा छळ करीत होते. रविवारी रात्री जेवणानंतर कृष्णाने मुलगी झाल्यावरून पुन्हा भांडण सुरू केले. त्यानंतर त्याच्यासह सासू राजूबाई, सासरा रूपसिंग, नणंद बायरा यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती ६० टक्के भाजली असून तिच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वंदनाच्या जवाबावरून ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Petted as the daughter went!