१५ आॅगस्टपूर्वी पेट्रोल होणार स्वस्त

By Admin | Updated: August 13, 2014 03:43 IST2014-08-13T03:43:48+5:302014-08-13T03:43:48+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक चांगली बातमी देण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले

Petrol will cost less than before August 15 | १५ आॅगस्टपूर्वी पेट्रोल होणार स्वस्त

१५ आॅगस्टपूर्वी पेट्रोल होणार स्वस्त

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक चांगली बातमी देण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिले असून, लीटरमागे पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांपर्यंत कमी करण्याची शक्यता या कंपन्यांनी वर्तविली. असे झाल्यास, पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दरकपात होणार आहे. तेल कंपन्यांची आढावा बैठक होईपर्यंत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला आणखी बळकटी मिळाली तर, अडीच नव्हेतर लीटरमागे तीन रुपयांची दरकपात शक्य होईल, असेही एका तेल कंपनीच्या उच्चाधिकाऱ्याने सांगितले.
कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत दिसून आलेली घट आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाला मिळालेली बळकटी या पार्श्वभूमीवर दरकपात करणे तेल कंपन्यांना शक्य आहे.

Web Title: Petrol will cost less than before August 15