राज्यात पेट्रोल स्वस्त

By Admin | Updated: May 18, 2016 05:24 IST2016-05-18T05:24:47+5:302016-05-18T05:24:47+5:30

पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली असली तरी महाराष्ट्रात त्यावरील अतिरिक्त अधिभार रद्द करण्यात आल्याने राज्यातील ग्राहकांना दरवाढीची कमी झळ बसली

Petrol in the state is cheap | राज्यात पेट्रोल स्वस्त

राज्यात पेट्रोल स्वस्त


पुणे : केंद्र सरकारकडून देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली असली तरी महाराष्ट्रात त्यावरील अतिरिक्त अधिभार रद्द करण्यात आल्याने राज्यातील ग्राहकांना दरवाढीची कमी झळ बसली. डिझेलवर ९१ पैसे व पेट्रोलवर १.१२ पैसे असलेला अधिभार सोमवारी मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देशात पेट्रोलचे दर ८३ पैसे वाढलेले असताना महाराष्ट्रात मात्र ६० पैसे स्वस्त झाले. तर देशात डिझेलचे दर १ रुपया २६ पैसे वाढले असताना महाराष्ट्रातील डिझेलवरील दरवाढ फक्त २१ पैसे झाली.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील डीझेल चे दर शेजारील राज्यांच्या तुलनेत स्वस्त होऊन महाराष्ट्रात डिझेलच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. महाराष्ट्रात विक्री वाढल्याने महसुल उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढेल. ग्राहकांना तुलनात्मक स्वस्त दरात इंधन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध आणि प्रवक्ते सागर रुकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Petrol in the state is cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.