नाशिकमध्ये गोमांस वाहतूक करणारे वाहन पेटविले
By Admin | Updated: September 17, 2014 02:36 IST2014-09-17T02:36:41+5:302014-09-17T02:36:41+5:30
कत्तलीचा परवाना नसताना बेकायदेशीरपणो गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारा पोलिसांनी पकडलेला टेम्पो संतप्त जमावाने पेटवून दिला.

नाशिकमध्ये गोमांस वाहतूक करणारे वाहन पेटविले
विंचूर/लासलगाव (नाशिक) : कत्तलीचा परवाना नसताना बेकायदेशीरपणो गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारा पोलिसांनी पकडलेला टेम्पो संतप्त जमावाने पेटवून दिला. गावक:यांनी गोमांस व्यवसाय करणा:यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करीत कडकडीत बंद पाळला.
विंचूर परिसरात तणाव असल्याने राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मित्रचा वाढदिवस करून परतत असताना येवल्याहून मुंबईकडे जाणा:या टेम्पोतून दरुगधी येणारे पाणी पडत होते. त्यामुळे संशय आल्याने या कार्यकत्र्यानी भरवस फाटा येथे टेम्पो अडविला. त्यात गायीचे 1क् ते 12 टन मांस आढळले. पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, बाळासाहेब सोनवणो यांनी लासलगाव पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलिसांनी टेम्पो लासलगाव पोलीस ठाण्यात जमा करून संशयित आरोपी सय्यद अजिज जिलानी व मोहम्मद हबीब शेख (दोघे रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध पशुवैद्यकीय अधिका:यांचा कत्तलीचा परवाना नसताना वाहनातून मांस वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
टेम्पोमधून दरुगधी येत असल्याने पोलिसांनी विंचूर एमआयडीसीच्या रस्त्यावर तो उभा केला. टेम्पो पकडल्याची बातमी गावात पसरल्यानंतर संतप्त विंचूरकरांनी तोडफोड करून तो पेटवून दिला.
राज्य राखीव दल तैनात; जमाव संतप्त
च्गोमांसाने भरलेला टेम्पो पकडल्याची बातमी गावात पसरल्यानंतर संतप्त विंचूरकरांनी तोडफोड करून तो पेटवून
दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण राज्य राखीव पोलिसांच्या तुकडीस पाचारण करण्यात आले.
125 जणांविरुद्ध
गुन्हा दाखल
च्ट्रक पेटविल्याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये 1क्क् ते 125 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चालक सय्यद जिलानी व क्लीनर मोहमद शेख यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.