७ सप्टेंबरला पेट्रोल पंप बंद!

By Admin | Updated: September 4, 2015 01:12 IST2015-09-04T01:12:33+5:302015-09-04T01:12:33+5:30

पेट्रोल व डिझेलवरील स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी करत राज्यातील २५ महापालिका क्षेत्रांतील पेट्रोलपंप चालकांनी ७ सप्टेंबरला बंदची हाक दिली आहे.

Petrol pump shut off on 7th September! | ७ सप्टेंबरला पेट्रोल पंप बंद!

७ सप्टेंबरला पेट्रोल पंप बंद!

मुंबई : पेट्रोल व डिझेलवरील स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी करत राज्यातील २५ महापालिका क्षेत्रांतील पेट्रोलपंप चालकांनी ७ सप्टेंबरला बंदची हाक दिली आहे. फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन्स (फामपेडा) या पेट्रोलपंप चालकांच्या संघटनेने गुरुवारी ही माहिती दिली.
व्यापाऱ्यांचा एलबीटी रद्द करणाऱ्या सरकारने आश्वासन देऊनही पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द केला नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. लोध यांनी सांगितले, व्यापाऱ्यांचा एलबीटी रद्द केल्याने नागरिकांना कोणत्याही वस्तू स्वस्त मिळणार नाहीत. याउलट पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द
केल्यास इंधन २ ते ५ टक्क्यांनी स्वस्त होईल.
सरकार मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने पेट्रोलपंप चालकांनी ७ सप्टेंबरला एक दिवसाची सामूहिक सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत संप नाही
मुंबई महानगरपालिकेत जकात कर असल्याने येथील पेट्रोलपंप चालक संपात उतरणार नसल्याचे लोध यांनी स्पष्ट केले. राज्यातील उरलेल्या
२५ महानगरपालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंप चालक संपात सामील होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Petrol pump shut off on 7th September!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.