शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Petrol, Diesel Price Today: कसला दिलासा! राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केली, पण पेट्रोल, डिझेलचे दर बदललेच नाहीत; गौडबंगाल काय?

By हेमंत बावकर | Updated: May 23, 2022 08:12 IST

No Petrol, Diesel Price cut Today: नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. गौडबंगाल काय?

- हेमंत बावकरमहागाईने सामान्यांची कष्टाची कमाई गिळंकृत करण्यास सुरुवात केल्याने दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. या आधीची कपात दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाली होती. पुन्हा एप्रिलमध्ये दर वाढले होते. मात्र, इतर राज्यांनी धडाधड कर कमी केले तरी आपल्या राज्य सरकारने आडमुठेपणा दाखवत दर कपात केली नव्हती. अखेर केंद्राच्या दुसऱ्या दरकपातीनंतर राज्य सरकारने किंचित का होईना व्हॅट कमी केला आहे. 

यामुळे नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यात पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. म्हणजेच नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. 

राज्यात पेट्रोलवरील कर २ रुपये ८ पैसे, तर डिझेलवरील कर १ रुपया ४४ पैशांनी कमी करण्यात आला आहे.  या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. केरळ, राजस्थान, ओडिशा या राज्यांनीही पेट्रोल - डिझेलवरील वॅटमध्ये कपात केली. मात्र दुसरीकडे भाजपशासित १२ पेक्षा अधिक राज्यांनी करकपात केलेली नाही. कर्नाटक सरकारने करकपातीबाबत विचार करू असे म्हटले आहे. भाजप सत्तेत असलेल्या या राज्यांनी गेल्यावेळी कपात केली होती. यामुळे त्यांनी सध्या इंटरेस्ट दाखविलेला नाही. 

महाराष्ट्रात व्हॅटमध्ये कपात झाली तरी....असे असले तरी महाराष्ट्र सरकारने दबावातून पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे. मात्र, आज राज्यातील पेट्रोल पंपांवर दर कमी झालेले नाहीत. काल रविवार असल्याने हे दर कमी न झाल्याची शक्यता आहे. या कर कपातीचा परिणाम उद्यापासून किंवा १ जूनपासून मिळणार आहे. आज कंपन्यांनी हे दर जैसे थेच ठेवले आहेत. यामुळे नागरिकांना आजचा दिवस किंवा पुढचे आठ-नऊ दिवस महाराष्ट्र सरकारने केलेल्या दर कपातीची वाट पहावी लागणार आहे. 

काय आहे आजचा दर...

  • मुंबईत आज पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल ₹ 97.28 प्रती लीटर आहे. 
  • पुण्यात आज पेट्रोल 110.95 रुपये आणि डिझेल ₹ 95.44 प्रती लीटर आहे. 
  • नागपुरात आज पेट्रोल 111.41रुपये आणि डिझेल ₹ 95.92 प्रती लीटर आहे.  
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलPetrol Pumpपेट्रोल पंप