पेट्रोल, डिझेल महागणार

By Admin | Updated: February 16, 2016 03:45 IST2016-02-16T03:45:08+5:302016-02-16T03:45:08+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने यापासून मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली आहे़ याचा मोठा फटका पालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे़

Petrol and diesel will be costlier | पेट्रोल, डिझेल महागणार

पेट्रोल, डिझेल महागणार

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने यापासून मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली आहे़ याचा मोठा फटका पालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे़ त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी कच्च्या तेलावरील जकातीचा दर तीन टक्क्यांवरून ४़५ टक्के करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे़ यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे़
पालिकेच्या उत्पन्नात जकात करातून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा ४४ टक्के आहे़ यात ४० टक्के उत्पन्न कच्चा तेलाच्या जकातीपासून मिळते. मात्र गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किमती ११० डॉलर प्रति बॅरलवरून ३२ डॉलर एवढ्या खाली आल्या आहेत. जकात कर हा आयात केलेल्या मालाच्या किमतीवर आकारण्यात येत असल्यामुळे पर्यायाने जकातीचे उत्पन्नदेखील कमी झाले आहे़
जकातीचे १२०० कोटी रुपये उत्पन्न या आर्थिक वर्षात कमी जमा झाल्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे़ त्यामुळे कच्च्या तेलाच्या जकात करामध्ये वाढ करण्याचे संकेत अर्थसंकल्पातूनच आयुक्त अजय मेहता यांनी दिले होते़ त्यानुसार पंधरवड्यातच हा करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर प्रशासनाने मंजुरीसाठी आणला आहे़ पालिका महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर ही करवाढ अमलात येणार आहे़ (प्रतिनिधी)2015-2016
या आर्थिक वर्षात कच्च्या तेलाच्या जकातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात १२५० कोटींची घट आली. त्यामुळे कच्च्या तेलावरील जकात करात दीड टक्का वाढ करण्यात येणार आहे़ यातून पाचशे कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे़ पालिकेने शक्यता फेटाळली : कच्चे तेल मुंबईस्थित विविध रिफायनरीला पुरविले जाते व त्यापासून डिझेल, पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थांचे उत्पादन होत असते़ त्यामुळे या करवाढीचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या दरावर पडण्याची शक्यता आहे़ परंतु ही शक्यता पालिकेने सध्या तरी फेटाळून लावली आहे़

Web Title: Petrol and diesel will be costlier