शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीने बिघडले सामान्यांचे बजेट; बसभाडेही महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 06:00 IST

पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या दराने सोमवारी नवा उच्चांक गाठला. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल ८७ रुपये २३ डिझेल ७५.७० रुपयांवर पोहोचले. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.तिन्ही तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात ३१ व डिझेलच्या दरात ३९ पैसे प्रति लीटरची वाढ केली. सलग १0 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनाने होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल ६८ रुपये प्रति लीटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल ७४ रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.आता तर डिझेलने ७५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मिनी टेम्पोसाठी मालवाहतूकदार प्रति किमी ५ रुपयांची दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. या मिनी टेम्पोद्वारे मुख्यत: भाजीपाल्याची वाहतूक होते. त्यामुळे भाजीपाला किलोमागे किमान ६ ते ८ रुपये किलोने महागेल.महाराष्टÑात डाळी वगळता, गहू, तांदूळ व तेल या धान्यांची आवक अन्य राज्यांतून होते. सुमारे ५०० ते ८०० किमी किंवा त्याहून अधिक अंतरावरून येणाºया या ट्रक्सच्या वाहतूक खर्चात डिझेल दरवाढीमुळे प्रति फेरी किमान २५०० ते ३००० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रक वाहतूकदारही भाडेदर वाढवतील आणि त्यामीळे धान्ये व किराण्याच्या किमती किलोमागे १० ते १२ रुपयांनी भडकतील.ड्रायव्हर्सच्या नोक-या संकटातशहरी व निमशहरी भागांत बहुतांश खासगी वाहने डिझेलवरील आहेत. दरवाढीमुळे वाहनमालकांनी गाड्या बाहेर न काढण्याचा निर्णय घेतल्यास ड्रायव्हरच्या नोकºया धोक्यात येण्याची भीती आहे.दुचाकीस्वारांना १३० कोटींचा भुर्दंडराज्यात रोज जवळपास दीड कोटी लिटर पेट्रोलची विक्री होते. त्यापैकी ८० टक्के पेट्रोल दुचाकीसाठी वापरले होते. महिनाभरातील पेट्रोल दरवाढीचा विचार केल्यास दुचाकीस्वारांच्या खिशाला किमान १३० कोटींचा भुर्दंड बसला आहे.बसभाडेही महागणारगणेशोत्सवासाठी अनेक जण गावी जातात. रेल्वेगाड्यांना गर्दी असल्याने ते लक्झरी बसेसचा आसरा घेतात. या बसगाड्या डिझेलवर धावतात. डिझेल दरवाढीमुळे बसगाड्यांच्या खर्चात प्रति किमी ७० ते ९० रुपये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम तिकीटदरांवर होईल. कोकणात जाणाºयांना गणोशोत्सवाच्या काळात एका तिकिटासाठी दोन हजारांवर रुपये मोजावे लागतील.

टॅग्स :Petrolपेट्रोलMaharashtraमहाराष्ट्र