पत्नीकडूनच छळ; क्षुल्लक कारणावरुन पतीचे डोके फोडले
By Admin | Updated: August 1, 2016 17:58 IST2016-08-01T17:58:51+5:302016-08-01T17:58:51+5:30
पत्नीचा पतीने छळ केल्याच्या बातम्या आपण नेहमीच एकतो; परंतु येथे पत्नीनेच पतीला अद्दल घडवलीयं. क्षुल्लक कारणावरुन संतप्त बायकोने गजाने नव-याचे डोके फोडले.

पत्नीकडूनच छळ; क्षुल्लक कारणावरुन पतीचे डोके फोडले
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १ - पत्नीचा पतीने छळ केल्याच्या बातम्या आपण नेहमीच एकतो; परंतु येथे पत्नीनेच पतीला अद्दल घडवलीयं. क्षुल्लक कारणावरुन संतप्त बायकोने गजाने नव-याचे डोके फोडले. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.
संतोष प्रभू खराडे (रा. नरसोबानगर, बीड) असे त्या पतीचे नाव. घडले असे, शनिवारी सायंकाळी पाच वाजता संतोष कामावरुन घरी आला. मुलीला काम सांगितले म्हणून पत्नी शिल्पाचा पारा चढला. पती- पत्नींतील बाचाबाचीचे पर्यवसान थेट हातघाईवर आले. यात संतोषला शिल्पा भारी ठरली. तिने जवळच पडलेला लोखंडी गज उचलला अन् पाठीमागून संतोषच्या डोक्यात घाव घातला. त्यानंतर रक्तस्त्राव झाला. तो मिस्त्रीकाम करतो. त्याला आरती नावाची मुलगी असून पत्नी शिल्पासोबत त्याचा सुखाचा संसार सुरु आहे. मुलगी आरतीने त्याच्याकडे चॉकलेटसाठी हट्ट धरला. कामावरुन परतल्याने तो थकला होता. त्यामुळे त्याने मुलीच्या हातावर पैसे टेकले अन् तिला दुकानावर धाडले. त्यामुळे शिल्पा संतप्त झाली. यातूनच तिने हे पाऊल उचलले. मित्रांनी संतोषला दवाखान्यात नेले. उपाचार घेतल्यानंतर डोक्याला बांधलेल्या पट्टीनिशी संतोष तडक शिवाजीनगर ठाण्यात पोहोचला. त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन पत्नी शिल्पाविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंद झाला.