पारसकर निलंबित
By Admin | Updated: August 27, 2014 04:33 IST2014-08-27T04:33:14+5:302014-08-27T04:33:14+5:30
बलात्काराचा आरोप असलेले पोलीस उपमहानिरिक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करा या गृहविभागाने धाडलेल्या प्रस्तावाला रात्री उशिरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिल्याचे समजते.

पारसकर निलंबित
मुंबई : बलात्काराचा आरोप असलेले पोलीस उपमहानिरिक्षक सुनील पारसकर यांना निलंबित करा या गृहविभागाने धाडलेल्या प्रस्तावाला रात्री उशिरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिल्याचे समजते.
गृहविभागतल्या सूत्रांनी ही माहिती दिली. पारसकर यांना निलंबित करावे आणि त्यांची विभागीय चौकशी व्हावी, अशी मागणी गृहविभागाने या प्रस्तावात केली होती. एका मॉडेलने पारसकर यांच्याविरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार
केली होती.
या तक्रारीवरून मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेने पुढील तपास केला. गुन्हे शाखेच्या
क्राईम अगेन्स्ट वूमन सेलने पारसकर यांचा जबाबही नोंदवून घेतला. तूर्तास या प्रकरणी पारसकर अटकपूर्व जामिनावर आहेत. (प्रतिनिधी)