एक खिडकीअंतर्गत गणेशोत्सव मंडळांना परवानग्या

By Admin | Updated: July 27, 2016 04:46 IST2016-07-27T04:46:21+5:302016-07-27T04:46:21+5:30

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या परवानग्यांमध्ये सुसूत्रता आणणार असून एक खिडकी योजनेअंतर्गत सर्व परवानग्या देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र

Permissions for Ganeshotsav Mandals under a window | एक खिडकीअंतर्गत गणेशोत्सव मंडळांना परवानग्या

एक खिडकीअंतर्गत गणेशोत्सव मंडळांना परवानग्या

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या परवानग्यांमध्ये सुसूत्रता आणणार असून एक खिडकी योजनेअंतर्गत सर्व परवानग्या देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांची याबाबत विधानभवनात भेट घेतली होती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Permissions for Ganeshotsav Mandals under a window