४० जणांची नावे वगळण्यास परवानगी
By Admin | Updated: December 19, 2014 04:55 IST2014-12-19T04:55:44+5:302014-12-19T04:55:44+5:30
जळगाव घरकुल प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात ९७ संशयितांविरूध्द गुन्हा दाखल आहे. पुरावे नसल्याने ४० संशयितांची नावे वगळण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.

४० जणांची नावे वगळण्यास परवानगी
धुळे : जळगाव घरकुल प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात ९७ संशयितांविरूध्द गुन्हा दाखल आहे. पुरावे नसल्याने ४० संशयितांची नावे वगळण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.
विशेष न्या. आऱ आऱ कदम यांच्यासमोर घरकुल प्रकरणाचे कामकाज गुरूवारी झाले़ या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात ३ फेब्रुवारी २००६ रोजी ९७ संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर न्यायालयात ५७ संशयितांविरोधात दोषारोप पत्र सादर झाले आहे. त्यामुळे उर्वरित ४० संशयितांची नावे पुरावे न मिळून आल्याने वगळण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. (प्रतिनिधी)