शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विद्यापीठांचे अर्थसंकल्प सादर करण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:47 IST

राज्यात आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विद्यापीठांचे अर्थसंकल्प सादर करण्यास उच्च शिक्षण विभागाकडून मनाई करण्यात आली होती.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णय : आचारसंहितेची आडकाठी दूरअर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल एप्रिलमध्ये अधिसभेची बैठक बोलावून अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता

पुणे : राज्यात आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विद्यापीठांचेअर्थसंकल्प सादर करण्यास उच्च शिक्षण विभागाकडून मनाई करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने उच्च शिक्षण विभागाचा हा आदेश रद्द् करीत विद्यापीठ आचारसंहितेच्या काळात अर्थसंकल्प सादर करू शकतील असे स्पष्ट केले आहे.  सार्वजनिक विद्यापीठांना अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता मिळावी यासाठी ‘विद्यापीठ विकास मंच’च्यावतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मंगळवारी उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. विद्यापीठांच्या अर्थसंकल्पांना ३१ मार्च पूर्वी मंजुरी न मिळाल्यास मोठया आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल न्यायालयाच्या निर्दशनास आणून देण्यात आले. विद्यापीठांचे अर्थसंकल्प मांडल्यामुळे मतदारांवर प्रभाव पाडणारे निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यापीठांनी येत्या १५ दिवसात अधिसभा घेऊन त्यांचे अर्थसंकल्प मंजूर करून घ्यावेत असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक ए. पी. कुलकर्णी यांनी दिली. सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर, अ‍ॅड. निल हेळेकर, निलेश ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली होती. 

बागेश्री मंठाळकर यांनी सांगितले, विद्यापीठे ही स्वायत्त संस्था असल्यामुळे विद्यापीठाच्या सिनेट बैठका या निवडणूक आचारसंहितेत येत नाहीत. परंतु राज्याच्या मुख्य सचिवांनी आचासंहितेच्या काळात विद्यापीठांनी कुठल्याही प्रकारच्या बैठका न घेण्याचे निर्देश सर्व विद्यापीठाना पत्र पाठविले. सर्व विद्यापीठांचे अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होतात. त्याला मंजुरी न मिळाल्यास अनेक आर्थिक पेचप्रसंग विद्यापीठासमोर उभे राहणार होते. त्यामुळे मुंबई, पुणे व एसएनडी विद्यापीठातील आम्ही तिघा सदस्यांनी पहिल्याच सुनावणीमध्ये दिला निकाल उच्च न्यायालयासमोर मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान शासनाकडून कशाच्या आधारे विद्यापीठांना अर्थसंकल्प सादर करण्यास मनाई केली जात असल्याची विचारणा शासनाच्या वकिलांकडे केली. त्यांना याबाबतचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पहिल्याच सुनावणीमध्ये न्यायालयाने विद्यापीठांना अर्थसंकल्प मांडण्यास मनाई करणारे उच्च शिक्षण विभागाचे परिपत्रक रदद् केले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन करून निर्णयसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी येत्या ३० मार्च रोजी अधिसभेची बैठक बोलावण्यिात आली होती. मात्र शासनाच्या पत्रानंतर ती रदद् झाल्याचे पत्र अधिसभा सदस्यांना पाठविण्यात आले होते. यापार्श्वभुमीवर  न्यायालयाने अर्थसंकल्प सादर करण्यास मुभा दिल्याने आता एप्रिलमध्ये अधिसभेची बैठक बोलावून अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठHigh Courtउच्च न्यायालयEducationशिक्षणBudgetअर्थसंकल्प